रेशन धान्याच्या ऑनलाईन प्रक्रियेत शिथिलता आणावी : माजी नगरसेवक मनोज साळुंखे

रेशन धान्याच्या ऑनलाईन प्रक्रियेत शिथिलता आणावी : माजी नगरसेवक मनोज साळुंखे 


शासनाकडून मिळणारे रेशनवरील अन्नाधान्य मिळण्यासाठी असणारी अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया ही मोठी आणि किचकट आहे. त्यामुळे पात्र असूनही अनेक कुटुंबे धान्यापासून वंचित राहतात. त्यामुळे या ऑनलाईन प्रक्रियेत शिथिलता आणावी यासाठी माजी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार आणि प्रभारी पुरवठा निरिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांना सहजपणे धान्य उपलब्ध होण्यासाठी आपण तातडीने प्रयत्न करु अशी ग्वाही दिली. वस्त्राद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजी शहरात कामगार वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. परंतु बहुतांशी कुटुंबांना रेशनचे धान्य मिळत नाही. धान्यासाठी असलेली ऑनलाईन प्रक्रिया ही मोठी आणि किचकट असल्याने अनेकजण धान्यापासून वंचित रहात आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्जाच्या प्रक्रियेत शिथिलता आणून गोरगरीबांना धान्य मिळावे यासाठी माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांनी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनानुसार वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा सुरु ठेवला आहे. शहरात पुरवठा निरिक्षण अधिकारी नसताना ऑनलाईन पध्दतीने याची अंमलबजावणी करून घेतली होती. परंतु ही ऑनलाईन प्रक्रिया मोठी आणि अत्यंत क्लिष्ट असल्याने अनेक कुटुंबांना धान्य मिळत नसल्याचे निदर्शनास आले. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांनी पुरवठा उपजिल्हाअधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण, अप्पर तहसीलदार सुनिल शेरखाने आणि प्रभारी पुरवठा निरिक्षण अधिकारी कल्पना पोळ यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यामध्ये धान्यासाठीच्या ऑनलाईन प्रक्रियेत शिथिलता आणावी अशी मागणी केली. यावेळी चर्चेत संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सहज शक्य होण्यासारखी सुविधा उपलब्ध करून वंचित गोरगरीब लाभार्थ्यांना धान्य मिळेल याची तजवीज करून त्यांना धान्य सुरू करून देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी विणकर संघटना प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे, संगांयो समिती सदस्य महेश ठोके, सतीश भस्मे, हुसेन मुजावर, ओमकार जाधव, शेखर भंडारे, भागवत जावीर, राजू सय्यद, शंकर यरगट्टी, प्रभाकर बावणे, संदिप गवड, रवि भांडे, पंकज तिप्पे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post