चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी नव्या उमेदीने काम करीत राहणार ; मा.खासदार अण्णासाहेब जोल्ले

 चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी नव्या उमेदीने काम करीत राहणार ; मा.खासदार अण्णासाहेब जोल्ले 


लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मी नम्रपणे स्वीकारतो. निवडणुकीमध्ये भाजपच्या   पदाधिकारी आणि कार्यकरते नेत्यांनी आपल्यासाठी जिवाचे रान केले. पण अपेक्षित यशाने हुलकावणी दिली. मी निवडून आलो नसलो तरी माझे विकास काम कधीही थांबणार नाही. पुन्हा नव्या उमेदीने उभे राहून चिकोडीच्या विकासासाठी येणाऱ्या काळात अधिक जोमाने पक्षाच्यावतीने काम करत राहणार आहे. मी आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे अशी ग्वाही माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी दिली. चिकोडी लोकसभा  निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहणाऱ्या प्रत्येक मतदाराला मी मनःपूर्वक धन्यवाद देतो. निवडणूक म्हटले की, जय पराजय हे होतच असतात. यापुढेही जनसेवेसाठी मी व निपणीच्या आमदार सौ.शशिकला जोल्ले हे तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहुन अजित कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post