No title

योगा विद्या धाम व गडहिंग्लज नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगा दिन साजरा 



योगा विद्या धाम व गडहिंग्लज नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगा दिन शुक्रवार 21 जून रोजी भारतासह जगातील सर्व देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या प्रित्यर्थ योगा विद्या धाम व गडहिंग्लज नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गडहिंग्लज नगरपरिषद शाहू सभागृहात जागतिक योगा दिनाचे औचित्य साधुन निरोगी जीवन कसे जगायचे या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून आयुर्वेदाचार्य डॉ.ओंकार निंगनुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गडिंग्लज नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड हे उपस्थित होते.डॉ.निंगनुरे यांनी उपस्थित लोकांना निरोगी जगण्याच्या टिप्स दिल्या. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर जुन्या-नव्या व्याधींवर मोफत मार्गदर्शन व सल्लाही दिला. यावेळी डॉ.विना कंठी, डॉ.नागेश पट्टणशेट्टी, डॉ.सुरेश संकेश्वरी, डॉ.बाबुराव फडके, अरविंद कित्तुरकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post