कोरोची-कबनूर परिसरातील मायक्रो फायनानचे कर्ज भरणाऱ्या महिलांवर होतोय अन्याय, शिवसेना अन्याय करणाऱ्याच्या विरोधात ठाम ; मंगल चव्हाण

कोरोची-कबनूर परिसरातील मायक्रो फायनानचे कर्ज भरणाऱ्या महिलांवर होतोय अन्याय, शिवसेना अन्याय करणाऱ्याच्या विरोधात ठाम ; मंगल चव्हाण


कबनूर येथील दत्तनगर मगदूम मला परिसरातील महिला मायक्रोफायनांचे कर्ज फेडत असताना त्यांना कर्ज फेडू नका असे दिव्या मगदूम सांगत आहेत पण ते कर्ज कसे माफ होणार हे त्यांनी खुलासा करून सांगावे असे बैठकीवेळी शिवसेना महिला आघाडी शहर उपसंघटिका प्रवीण हैदर यांनी बैठकीवेळी बोलले. कोरोची-कबनूर दत्तनगर परिसरात  इचलकरंजीतील एक महिला  मायक्रो फायनान चे गटाद्वारे कर्ज घ्या व ते भरू नका असे सर्वांच्या घरो- घरोघरी जाऊन सांगत आहे. यामुळे महिलांचे बँकेतील सिविल खराब होत आहेत. त्या महिलेला आवर घालण्यासाठी शिवसेना अन्याय निवारण महिला आघाडीची स्थापना केली असून यामध्ये भागातील  महिला त्या महिलेविरुद्ध आवाज उठविला असून कोणीही त्या महिलेचेऐकून घेऊ नये व सदर महिलेविषयी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पी.आय. राजू तहसीलदार यांच्या समोर बैठक पार पडली यामध्ये त्यांनी जी महिला मायक्रो फायनान चे कर्ज घेऊन भरणार नाही त्या महिलेविरुद्ध तक्रार आल्या अस तिच्यावर कारवाई करण्यात येईल असे म्हणाले. तसेच छत्रपती शासन संस्थेच्या दिव्या मगदूम यांनी या सात शिवसेना महिला आघाडीच्या सदस्या या मायक्रो फायनानच्या एजंट आहेत त्यांचे कोणीही ऐकू नये व फायनानच्या हप्ते भरू नये अशी अफवा परीसरात पसरवली आहे त्या सात महिलांनी त्यांना आवाहन केले आहे की त्यांनी मायक्रो फायनान्स एजंट असल्याचा पुरावा दाखवावा असे कोरोचीत भास्कर कार्यालय येथे पार पडलेल्या बैठकीवेळी बोलत होत्या.यावेळी बोलताना शिवसेना महिला आघाडी  जिल्हाप्रमुख मंगल चव्हाण म्हणाल्या की सर्वांनी व्यवहारात राहिले पाहिजे सध्या बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकार सामोरे येत आहेत अनेक सर्वसामान्य लोक अडचणीत असताना देखील बँकेचे व बचत गटाचे कर्ज नियमितपणे फेड करत असतात तथापि काही संघटनेच्या माध्यमातून कर्ज बुडवा असे सांगून दिशाभूल करीत असतात त्यामुळे महिला मद्ये गैरसमज होत आहे याकरिता शिव सेना प्रणित महिला आघाडी अन्याय निवारण संघटना हे स्थापन झाले असून त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व शिवसैनिक आहोत तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचि बदनामी करणाऱ्यांवर शिवसेना स्टाईलने आवर घालू असे म्हणाले. तसेच भिम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अन्याय होणाऱ्या महिलांच्यापाठीशी आहोत असे भिमशक्ती सामाजिक संघटनेचेे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी आपल्या मनोकातत व्यक्त केले.सदर बैठक प्रसंगी हातकलंगले शिवसेना तालुकाप्रमुख आनंद शेट्टी , शिवसेना महिला तालुकाप्रमुख शोभा गोरे ,शिवसेना महिला उप तालुकाप्रमुख लक्ष्मी बूरले, विभाग प्रमुख मधुमती खराडे, भरत शिवलिंगे, भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीताइ गारवे,  तालुका अध्यक्ष पौर्णिमा देसाई, जयश्री गागडे, विद्या खानापुरे, अर्चना देसाई कबनूर शहर प्रमुख शहिदा सनदी, परवीन हैदर, सुप्रिया परीट, भाग्यश्री  तोरसे,मुमताज सनदी, सुमन महाजन, विद्या खानापुरे ,नुरज्या कमालश्या, सोनाली जाधव ,सुनिता गोसावी आदींसह महिला व नागरिक उपस्थित होते.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी करोचीहून :- अमित काकडे 

Post a Comment

Previous Post Next Post