‘या’ 8 मार्गावर धावणार वंदे भारत मेट्रो ट्रेन ; महाराष्ट्रालाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट
वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ट्रेन आहे. ही गाडी 2019 मध्ये पहिल्यांदा धावली होती. पहिल्यांदा ही गाडी देशातील नवी दिल्ली ते वाराणसी या महत्त्वाच्या मार्गावर सुरू झाली. यानंतर देशातील अन्य महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे टप्प्याटप्प्याने संचालन सुरू करण्यात आले. सध्या स्थितीला भारतातील एकूण 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी धावत आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते जालना, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर या गाडीचे यशस्वीरित्या संचालन सुरू आहे. विशेष बाब अशी की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अर्थातच चार जून नंतर कधीही महाराष्ट्राला मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. स्वतःकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता पाहता आता वंदे भारत मेट्रो आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू केल्या जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळण्याची दाट शक्यता आहे. ही पहिली स्लीपर ट्रेन पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.