दूधगंगा नळ पाणी योजनेचा अहवाल शासनाला लवकरच सादर ; जिल्हाधिकारी येडगे

दूधगंगा नळ पाणी योजनेचा अहवाल शासनाला लवकरच सादर ; जिल्हाधिकारी येडगे 


दूधगंगा योजनेच्या तांत्रिक समितीचा अहवाल एक महिन्याच्या आत शासनाकडे पाठवणे आवश्यक होते. तो तातडीने शासनाकडे पाठवावा, यासाठी इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अहवाल शासनाकडे पाठविण्यासाठी तातडीने कार्यवाही करु असे शिष्टमंडळास आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे, औद्योगिक आघाडी राज्य अध्यक्ष सुभाष मालपाणी, औद्योगिक आघाडी शहर अध्यक्ष अशोक पाटणी, अल्पसंख्यांक आघाडी शहर अध्यक्ष सलीम ढालाईत, वैद्यकीय मदत सेल आघाडी शहर अध्यक्ष राजू आरगे, शहर कार्याध्यक्ष अमित गाताडे, सूर्यकांत कडुलकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post