दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची बदली
सततच्या बदलीमुळे राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेले पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. वर्षभरात बदली झालेले मुंडे यांना आता असंघटित कामगार विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या कुटुंब कल्याण, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक म्हणून अमगोथू श्रीरंगा नायक यांची नियुक्ती केली आहे. या ठिकाणी असलेले धीरजकुमार यांना नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. केंद्रीय सेवेत प्रतिनियुक्तीवर गेलेल्या व्ही.राधा यांची राज्याच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी तर रणजित कुमार यांची यशदाच्या अतिरिक्त महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.