अंगारकी संकष्टीनिमित्त पंचगंगा वरद विनायक मंदिरात विविध कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन

अंगारकी संकष्टीनिमित्त पंचगंगा वरद विनायक मंदिरात विविध कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन 



इचलकरंजी, दि. 23 (प्रतिनिधी) येथील पंचगंगा नदी किनारावरील श्री पंचगंगा वरद विनायक मंदिरात 25 जुन रोजी अंगारकी संकष्टीनिमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्यावतीने प्रसाद वाटप, इचलकरंजी केटरर्स असोसिएशन, मंडप लाइटिंग असोसिएशन, भक्त मंडळाच्या सहकार्याने चंद्रोदयानंतर महाप्रसाद होणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पंचगंगा वरद विनायक मंदिरातील श्रींची नवसाला पावणारा अशी ख्याती आहे. त्यामुळे या मंदिरात नेहमीच भविकांची दर्शनासाठी गर्दी असते. या मंदिरात अंगारकी संकष्टीनिमीत्त मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. सकाळी 8 वाजता नित्य पुजा आरती, 11 वाजता मंदिरात भक्तांना शाबु खिचडी प्रसाद वाटप करण्यता येणार असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी 5 वा. दत्त भजनी मंडळ, कबनुर यांचे भजन, रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी चंद्रोदय आरती होणार आहे. तर इचलकरंजी केटरर्स असोसिएशन, मंडप लाइटिंग असोसिएशन आणि मंदिर भक्त मंडळाच्या सहकार्याने 10 हजार भक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 नंतर हा महाप्रसाद सुरु होणार आहे. पावससाची शकता धरुन असोसिएशन मार्फत भोजनाची व्यवस्था साठी निवारा व प्रसादालय शेड उभारण्यात येणार आहे आपले श्रद्धास्थान स्वच्छ ठेवावे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर भक्त मंडळ व केटरिंग मंडप असोसिएशन संयोजकांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post