शेतामध्ये विद्युत तारेचा स्पर्श होऊन कसनाळ येथील युवकाचा मृत्यू ; वडिल गंभीर
कसनाळ ता.निपाणी येथील राजन व हरिशचंद्र नाईक हे पिता पुत्र आपल्या आयकोरोडवर असलेल्या कोडी येथील शेतात मशागत करण्यासाठी गेले होते. शेतामध्ये नांगरत असताना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेतातून गेलेली विद्युत वायर उचलून बाजूला करत असताना राजन नाईक यांना जोराचा विद्युत तारेचा धक्का बसला. यावेळी मुलग्याला जोराचा धक्का बसल्याने वडील हरिशचंद्र नाईक मदतीला गेले असता त्यांनाही धक्का बसला यावेळी पिता पुत्र गंभीर अवस्थेत होते. त्यांना इचलकरंजीच्या शासकीय दवाखान्यात दाखल केले असता राजन नाईक यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर वडील हरीशचन्द्र यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजन नाईक हा मनमिळाऊ स्वभावाचा व शिवभक्त होता. अशा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कसनाळ गावावर शोककळा पसरली आहे. राजन नाईक यांच्या पश्चात पत्नी व दोन वर्षाचा मुलगा आहे. घटना स्थळावरारून मिळालेली अधिक माहिती अशी की कसनाळ तालुका निपाणी येथील शेतामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीने नांगरत असताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन झालेल्या घटनेत मुलगा राजन हरिशचंद्र नाईक वय ३१ याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे वडील हरिश्चंद्र नाईक यांची तब्येत बिकट असल्याने त्यांच्यावर इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजन नाईक यांच्या अकाली निधनाने कसनाळसह परीसरात हळ हळ व्यक्त केले जात आहे. सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे