अपहरण करणेच्या उद्देशाने पाठलाग करून लोखंडी रॅाड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून मारहाण केलेप्रकरणी ६ जणांना जामिन मंजुर ; ॲड.रियाज बाणदार

अपहरण करणेच्या उद्देशाने पाठलाग करून लोखंडी रॅाड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी करून मारहाण केलेप्रकरणी ६ जणांना जामिन मंजुर ; ॲड.रियाज बाणदार




शुक्रवार दिनांक १७ मे २०२४ रोजी दुपारी दिड वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी हर्षवर्धन भरत कांबळे, रा.पट्टणकोडोली, ता.हातकणंगले, जि. कोल्हापुर यास आरोपी दौलत राहुल कांबळे, छबु राहुल कांबळे, रुषिकेश मारुती पाटील, रुषिकेश लक्ष्मण कुऱ्हाडे, सौरभ लक्ष्मण कुऱ्हाडे, अजिंक्य बाजीराव घाटगे सर्व राहणार जयसिंगपुर यांनी सर्वांनी मिळुन फिर्यादीस त्याच्या भावासोबत पट्टणकोडोली येथील असलेल्या प्लॅाट व घराच्या वाटणीच्या वादातुन, फिर्यादीचा पाठलाग करून फिर्यादी हा त्याचा घरमालक संजय कागले याच्या घरात लपला असता, त्यास त्यांच्या घरातुन बाहेर ओढुन काढुन लोखंडी रॅाडने व लाकडी काठ्यांनी पाठीत व डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले. सदर प्रकरणी फिर्यादीने प्राथमिक आरोग्य केंद्र, हुपरी येथे दिलेल्या जबाबवरुन आरोपींविरूद्ध बेकायदेशीर जमाव जमवुन फिर्यादीचा पाठलाग करून फिर्यादीस गंभीर जखमी केल्या प्रकरणी हुपरी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेत आला. सदर प्रकरणी एकुण ६ आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता आरोपींच्यावतीने ॲड.रियाज बाणदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानुन सर्व आरोपींची पहिल्याच दिवशी जामिनावर मुक्तता करणेत आली. सदर कामी आरोपींचे वकील ॲड. रियाज बाणदार यांनी आरोपी व फिर्यादीचे एकमेकांसोबत असलेले नातेसंबंध तसेच परस्पर विरोधी फिर्यादी तसेच फिर्यादीच्या जखमांबाबतचा वैद्यकीय अहवाल या संदर्भी ॲड.रियाज बाणदार यांनी केलेल्या युक्तिवादाआधारे आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post