स्वरूप मेटील याची इंडियन एअर फोर्समध्ये मेडिकल असिस्टंट पदी निवड
दिंडनेलेॅ येथील स्वरूप अनिल मेटील याची भारतीय एअर फोर्समध्ये मेडिकल असिस्टंट पदी निवड झाली आहे. स्वरूप याने अत्यंत मेहनत जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. स्वरूप याचा भाऊ देखील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. शालेय जीवनापासून स्वप्न बाळगलेल्या स्वरूप याने भारतीय एअरफोर्स दलामध्ये मेडिकल असिस्टंट पदी निवड होऊन आकाशाला गवसणी घातली आहे त्याच्या या निवडीने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तसेच स्वरूप हा दिपावली पासून श्री संत सदगुरू बाळुमामांच्या बगा नं 6 मध्ये सेवेच व्रत सुरू होत आणि योग्य वेळी जगाचा मालक श्री संत सदगुरू बाळुमामानी सेवेचा पगार देऊन ' आकाशी झेप घे रे पाखरा' या प्रमाणे यशोकिर्तीचा आशिर्वाद दिला याच आशिर्वादाच्या जोरावर इंडीयन एअर फोर्स मेडिकल असिस्टंट पदी निवड झाली असल्याचे स्वरूप मेटील यांनी सांगितले.