प्रोसेस कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा ; कामगार सेनेचे निवेदन

प्रोसेस कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा ; कामगार सेनेचे निवेदन


 

प्रोसेसमधील कामगारांना किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा व कॉन्टॅक्ट पद्धत बंद करा या व इतर मागणींचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त यांना कामगार सेनेच्या शिष्टमंडळाच्यावतीने देण्यात आले.निवेदनात असे म्हटले आहे की, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले तालुक्यामध्ये मोठमोठ्या प्रोसेसचे युनिट आहेत तरी सदरच्या प्रोसेसमध्ये पुरुष कामगार व महिला कामगार हे बारा बारा तास काम करत असून या कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे कोणतेही हक्क मिळत नाहीत. आठ तास काम मिळत नाही, ना फंड, आठवडा सुट्टी, रजा पगार, हजेरी कार्ड, पगार पत्रक, दवाखाना इत्यादी कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. अशा प्रोसेसवर कायदेशीर कारवाई करून कामगार वर्गाला न्याय द्यावा अन्यथा महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. सदरचे निवेदन सरकारी कामगार अधिकारी राहुल तोडकर यांनी स्विकारले. शिष्टमंडळात महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम, केप्पाण्णा हलगेकर, अल्ताफ मुजावर, शहानवाज चांदकोटी, राहुल कडगावे, सुभाष इंगळे, कुबेर सावंत, सचिन देवकारे, प्रकाश परीट, जयश्री परीट, संजय शहा इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post