सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कपिल सिब्बल यांची निवड
सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची गुरुवारी १६ मे रात्री उशिरा निवड झाली. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेच मतमोजणी झाली. या निवडणुकीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा विजय झाला. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विजय मिळवला आहे. कपिल सिब्बल यांना १,०६६ मते मिळाली.