दहावीचा उद्या निकाल : रिझल्ट पाहण्यासाठी ‘येथे’ क्लिक करा

 दहावीचा उद्या निकाल : रिझल्ट पाहण्यासाठी ‘येथे’ क्लिक करा 

मागील आठवड्यात बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यानंतर दहावीचा निकाल कधी याबाबत सर्वत्र विचारणा होत होती आणि तारखेची उत्सुकता देखील लागून राहिली होती. तर आता दहावीचा निकाल पाहण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा संपली असून हा दहावीचा निकाल उद्या सोमवारी दिनांक 27 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल आपल्याला ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. यंदाच्या दहावीच्या निकालाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच दहावीचा निकाल मे महिन्यामध्ये जाहीर होत आहे. याबद्दल विद्यार्थी व पालकातून बोर्डाचे धन्यवाद मानले जात आहेत. निकाल पाहण्यासाठी खालील पद्धतीच्या स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा निकाल पहा. आईचे नाव टाकून महाराष्ट्र 10 वीचा निकाल पाहता येणार. फक्त खालील स्टेप्स फॉलो करा.

• mahresult.nic.in ला भेट द्या.

• SSC Examination Result 2024 वर क्लिक करा.

• रोल नंबर आणि आईचे नाव टाका.

• त्यानंतर तुम्हाला SSC Result तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

एसएमएसवर चेक करा 10 'वीचा निकाल

• एसएमएस (SMS) वर निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम फोनमधील मेसेज बॉक्स ओपन करा.

• त्यानंतर MHSSC (स्पेस द्या) सीट नंबर किंवा रोल नंबर टाईप करा.

• मग हा टाईप केलेला मेसेज 57766 या क्रमांकावर सेंड करा.

• यानंतर तुम्हाला मेसेजवर तुमचा निकाल पाहता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post