मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनींची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनींची भेट



गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईं गडकरी यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना कौशल्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली. याप्रसंगी त्यांच्यावर सुरू असलेल्या औषधोपचाराबद्दल जाणून घेतले. यावेळी अरुणाताईंवर शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती त्यांनी डॉक्टरांना केली.

Post a Comment

Previous Post Next Post