वस्त्रोद्योगाला पुन्हा एकदा सुवर्णकाळ आणण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करेन ; सत्यजित पाटील

वस्त्रोद्योगाला पुन्हा एकदा सुवर्णकाळ आणण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करेन ; सत्यजित पाटील



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडी पुरस्कृत हात रंगले लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील आबा यांच्या प्रचारार्थ आज इचलकरंजी शहरांमध्ये इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे प्रमुख विनय महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत बैठक झाली या बैठकीदरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वस्त्रोउद्योगासंदर्भात केलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने बोलताना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांनी जर मला लोकसभेसाठी संधी दिली तर दिल्ली दरबारी इचलकरंजीतील वस्त्रोद्योगातील अडचणींचे निराकरण करण्यासाठी व वस्त्रोद्योगाला पुन्हा एकदा सुवर्णकाळ निर्माण होण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करेल अशी ग्वाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील आबा यांनी दिली. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदनराव कारंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, राष्ट्रीय काँग्रेस शहराध्यक्ष संजय कांबळे, शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, माजी नगरसेवक संजय तेलनाडे आणि  विनय महाजन आदिंसह प्रमुख पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post