उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध ; उद्योग मंत्री उदय सामंत
केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे, फडणवीस, अजित दादा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील उद्योग वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे, उद्योग वाढीबरोबरच रोजगार निर्मितीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उद्योजकांना सोयीसुविधा पुरवताना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी देखील राज्य शासनाने घेतली आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांनी महायुतीच्या संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध उद्योगातील उद्योजकांचा संवाद मेळावा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे पार पाडला. मेळाव्यास नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार सावंत उपस्थित होते. संवाद मेळाव्यासाठी उपस्थित राहिलेल्या उद्योजक प्रतिनिधींनी विविध अडचणी आणि समस्या मंत्री सामंत यांच्यासमोर मांडल्या, उद्योजकांची पाठराखण करतानाच शासनाने विविध सोयी सुविधा सवलती उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. त्यानंतर मंत्री सामंत यांनी आपल्या भाषणामध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या उद्योग धोरणाचा परामर्ष केला. उद्योजकांनी केलेल्या सूचनांचा विचार करून त्यांच्या समस्या निरसन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले विशेषतः इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसायातील वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी कारखानदारांना घातलेल्या ऑनलाइन नोंदणीच्या अटीचा पुनर्विचार करतानाच आचारसंहिता संपल्याबरोबर ती अट रद्द करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. स्वागत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी केले इचलकरंजीचे ज्येष्ठ नेते मिश्रीलाल जाजू आणि उद्योग प्रतिनिधी ललित गांधी यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. आभार अनिल डाळ्या यांनी मानले. प्रोसेस असोसिएशन, एअर जेट असोसिएशन, सायझिंग असोसिएशन, किराणा भुसारी व्यापारी असो, कोल्हापूर सराफ असो, कोल्हापूर इंजिनिअरिंग असो, कोल्हापूर टेस्टिंग असो, बंगाली असो, स्वर्ण कारागिरी असो, क्रेडाई अँड बिल्डर असो, ग्रेड मर्चंट असो, शटललेस लूम ऑनर असो, टिम्बर असो, प्लायवूड असो, इलेक्ट्रिक असो, रवा मैदा असो, कोल्हापूर टायर डीलर्स, चांदी असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य यांच्यासहसंपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योग प्रतिनिधी या बैठकीमध्ये उपस्थित होते.