सत्यजित पाटील यांना पँथर आर्मी सेनेचा जाहीर पाठींबा
पॅथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते फिरोज मुल्ला सर यांच्या आदेशानुसार हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील आबा यांना शिरोली शिवानी मंगल कार्यालय येथे निर्धार मेळयाव्यात जाहीर पाठिंबा देण्यात आला. पाठिंबाचे लेखी पत्र पँथर आर्मी स्वराज क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे यांनी लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील आबा यांना दिले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्वसामान्य जनतेला संविधानाच्या माध्यमातून जगण्याचा सार्वभौम हक्क व अधिकार दिले एकाधिकारशाहीच्या कर्तृत्वामुळे देशातील संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे अशा प्रसंगी आपण संविधान व लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तमाम संविधानवादी जनतेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याकरता हातकलंगले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो पँथर आर्मी स्वराज क्रांती सेनेच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित पाटील यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना कोल्हापुर जिल्हाप्रमुख संजय चौगुलै, डॉक्टर सुभाष मधाळे, कुमार कांबळे, श्रीकांत मोरे, अशोक पाटील, प्रकाश स्वामी राजू पेढारी, सचिन हुपरे, भिमराव कांबळे आदी उपस्थित होते .