कोरोची उपसरपंच विकी माने यांचा उपसरपंच पदाचा राजीनामा उपसरपंच विकी माने यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा हातकणंगले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे दिला आहे ग्रामपंचायत मध्ये सरपंच नसल्यामुळे प्रशासक नेमणूक होणार आहे
कोरोची ग्रामपंचा-यतीचे उपसरपंच विकी सर्जेराव माने यानी गटा अंतर्गत ठरलेप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा हातकणंगले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे सोमवारी दिला. यापुर्वी सरपंच डाॕ. संतोष भोरे याना सरपंच पदासाठी अपात्र ठरविलेने त्यांचे पद सद्या रिकामे आहे. त्यामुळे उपसरपंच पद निवड होईपर्यंत ग्राम-पंचायतीवर प्रशासकाची नेमणूक होणार आहे.
ग्रामपंचायतीत भाजपा, ताराराणी विकास आघाडी व अपक्ष मिळून सत्ता आहे. त्यांचे १० सदस्य आहेत. दर पाच महिन्यानी या दहा जणात चिठ्ठी टाकून उपसरपंच निवडायचे असे ठरले होते. पहिली संधी आनंदा लोहार तर दुसरी संधी विकी मानेना मिळाली होती. दरम्यान विकी माने याना मुदत संपुनही दोन वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र त्यानी राजी-नामा दिला नाही, म्हणून त्यांचेवर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र त्यांनी नेत्यांचा मान राखत आपल्या पदाचा राजीनामा दिला. उपसरपंच पदाचा राजीनामा हा पंचायत समिती सभा सभापती यांच्याकडेदेण्याचे होते पण ते पद रिक्त असल्यामुळे प्रभारी सभापती म्हणून गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्याकडे सुपूर्द केला.ते राजीनामा मंजूर करून ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे यांच्याकडे देतील तेव्हा विकी माने यांचा राजीनामा मंजूरी साठी मासिक सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.असे ग्रामविकास अधिकारी आनंद गडदे यांनी माहिती दिली.