हातकणंगले लोकसभेची निवडणूक कमळ चिन्हावर लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेली मागणी ही वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिले. शहर भाजप कार्यालयात महिलांचा नारी शक्ती वंदन मेळावा व महिला आघाडी शहर कार्यकारिणी निवड पत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सौ.वाघ म्हणाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला कोणी रोखू शकणार नाही. जनताच भाजपसाठी मतदान करण्यास इच्छुक आहे. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी पंतप्रधान मोदींची गरज आहे. यापूर्वी झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकीत महिलांनी सर्वाधिक मतदान केले आहे. पंतप्रधान होणे ही मोदींची गरज नसून आपली गरज आहे. महिलांनी दररोज २० घरांमध्ये जाऊन मोदी, कमळ व भाजप पोहोचविण्याचा निर्धार केला पाहिजे. महिलांसाठी अनेक योजना राबविल्या. त्या योजना घराघरांत पोहोचविल्या पाहिजेत. तर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर यांनी, कामे भाजपा करतो. समस्या आम्ही सोडवितो. त्याचा लाभ भाजपला झाला पाहिजे. येणारा खासदार कमळ चिन्हावर असावा, अशी भावना सर्व कार्यकर्तेची आहे. सौ. महाडिक म्हणाल्या महिलांना मोदीजींनी प्रवाहात आणले आहे. तर महायुतीचा खासदार करण्यासाठी राज्यभर रॅली काढली जात आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा सौ.पाटील यांचेही भाषण झाले. प्रथम शिवतीर्थ येथे सौ.वाघ यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महिलांच्या रॅलीला सुरुवात झाली रॅलीमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. रॅली शहर कार्यालयात पोहोचल्यानंतर शहर अध्यक्षा सौ.अश्विनी कुबडगे यांनी प्रास्ताविक केले. जयश्री गाठ, नीता माने, रमा फाटक, अलका शिंदे, तेजस्विनी पाटील, शहराध्यक्ष पै.अमृत भोसले, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, उपाध्यक्ष अनिस म्हालदार, बाळकृष्ण तोतला, दिपक पाटील, हेमंत वरूटे, महेश पाटील, योगिता दाभोळे, निता भोसले, रागिनी शर्मा, वर्षा पाटील, विजया पाटील, रूपाली बरगाले, सुप्रिया मजले, छाया तोडकर, माधवी मुंडे, संगीता घोरपडे, अमिता बिरंजे, निर्मला मोरे, पुनम भोसले, मनीषा नाईक, मधुमती तोरगुले, अंजना शिंदे आदी महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हातकणंगले लोकसभेची जागा भाजपला मिळावी ही कार्यकर्त्यांनी केलेली मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवू ; चित्रा वाघ
byVijay Todkar
-
0