हायकोर्टाने दिलेल्या निर्णया नंतर मंत्रालयातील नेत्यांनी नेमप्लेटवर लावले आईचे नाव



उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आईबद्दलचं आपलं वेगळं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी एक चांगली कृती केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या मंत्रालयातील कार्यालयाच्या बाहेर असलेली नावाची पाटी बदलली आहे. दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यालयाच्या बाहेर आईच्या नावासह नवीन नेमप्लेट लावली आहे. दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या नावाची पाटी बदलली आहे. वडिलांच्या नावासोबतच आईचंही नाव लावता येऊ शकतं, असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती. त्यावर हायकोर्टाने हा निर्णय दिला होता. त्यानंतर मंत्रालयातील फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावाची पाटी बदलण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांकडून या माध्यमातून एकप्रकारे आपल्या आईबद्दलचं प्रेम आणि आदर व्यक्त करण्यात आलं आहे. यंदाच्या जागतिक महिला दिनी (8 मार्च रोजी) जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त-नियोजनमंत्री अजित पवार यांनी पटकावला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी, सुट्टीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी झळकली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post