डिजिटल मीडिया इचलकरंजीच्या समन्वयक पदी विजय तोडकर यांची तर खजिनदार पदी रणधीर नवनाळे यांची निवड



डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, इचलकरंजी महानगरच्या बैठकीत प्रभारी खजिनदार पदी रणधीर प्रकाश नवनाळे यांची तर समन्वयक पदी विजय बचाराम तोडकर यांची नियुक्ती करण्यात आली. दोघांनाही निवडीचे पत्र संघटनेचे अध्यक्ष विनायक कलढोने यांनी दिले.

विविध विषयावर चर्चा करण्यासाठी संघटनेची आज बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विनायक कलढोने होते. संघटनेची सदस्य संख्या निश्चित करणे, संघटनेचे नियम ठरवणे, विविध उपक्रमांची चर्चा करणे  खजिनदार, आणि समन्वयक पदी नियुक्ती करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील व जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांच्या मार्गदर्शनाखाली  इचलकरंजी महानगराच्या प्रभारी खजिनदार पदी रणधीर प्रकाश नवनाळे यांची तर समन्वयक पदी विजय बचाराम तोडकर यांची नियुक्ती करण्यात आली.

संघटनेने दिलेली जबाबदारी आपण योग्य रित्या पार पाडू आणि संघटना बळकटीकरणासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय रणधीर प्रकाश नवनाळे आणि विजय बचाराम तोडकर यांनी व्यक्त केला.

यावेळी उपाध्यक्ष निखिल भिसे, सेक्रेटरी सलीम संजापुरे, सदस्य राजू म्हेत्रे, सचिन बेलेकर, संतोष काटकर, संदीप पाटील, रसूल जमादार, अंकुश पोळ, संतोष मोकाशी, सद्दामहुसेन मुल्ला, प्रीती कलढोणे, हर्षदा कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post