कोरोचीत जादा पैसे घेऊन असेसमेंट उतारा परस्पर नोंदणी केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी यांना सरपंचांनी घातले डांबून
कोरोची वार्ताहर : अमित काकडे
कोरोची येथे नवीन प्लॉट विक्रीसाठी ग्रामविकास अधिकारी आनंत गडदे यांनी ग्रामपंचायतच्या कोणत्या अधिकाऱ्याला न समजता परस्पर ज्यादा पैसे आकारून असेसमेंट उतारा नोंदणी करून दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर सरपंच डॉ.संतोष भोरे यांनि ग्राम विकास अधिकारी यांना केबिनमध्ये डांबून घालून चांगले धारेवर धरले व खडा जंगी सुरू असताना त्यांना काहीच उत्तर देता येईना म्हणून तिथून पलायन केले. कोरोची ग्रामपंचायतकोरोची ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी अनंत गडदे यांनी लोकमान्यनगर परिसरातील जागा विक्रीसाठी 17 असिस्टमेंट उतारे ज्यादा पैसे आकारून ग्रामपंचायतमधील कोणत्याच अधिकाऱ्याला याचा थाग पत्ता न लागता नोंदी घालून दिल्याचे सरपंच डॉ.संतोष भोरे यांच्या लक्षात आल्यावर ग्रामविकास अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरून केबिनमध्ये डांबून घातले व किती रुपये घेऊन नोंदी घेतल्याचे विचारले असता 40 हजार रुपये घेऊन नोंदी घातले आहे असे कबुली दिली व तुम्ही परस्पर आणखीन किती नोंदी घातले आहेत याची विचारणा केली असता त्यांना काहीच उत्तर देता येईना खडा जंगी सुरू असताना केबिन सोडून पळून गेले. प्लॉट एजंट यांनी चार दिवसापूर्वी सरपंच डॉ संतोष भोरे यांना भेटून लोकमान्यनगर परिसरातील 7 प्लॉट विक्री करणार आहे तरी याचा असिस्टमेंट दप्तरी नोंद करावी अशी विनंती केली होती यावर सरपंच यांनी तुम्ही जो प्लॉट विक्री करणार आहात त्या ठिकाणी रस्ते गटर्स लाईटची सोय करावी मगच प्लॉट विक्री करावेत पहिला त्या ठिकाणी सोयी करा मगच तुमची असेसमेंट उतारा दप्तरी नोंद केली जाईल असे सांगितले असताना सुद्धा ग्रामविकास अधिकारी यांच्याशी हात मिळवणी करून कोणालाही हाणपत्ता न लागता परस्पर ज्यादा पैसे आकारून नोंदी घातल्याचे सरपंच डॉ.संतोष भोरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ग्रामविकास अधिकारी अनंत गडदे यांना चांगलेच धारेवर धरले व प्लॉट एजंट यांना बोलावून सदरची नोंद रद्द करण्यात आलेली. प्रथम तुम्ही त्या जागेवर सर्व सोयी पूरवा मगच असेसमेंट दप्तरी नोंद केली जाईल असे सांगितले व सदर जागेबाबत रजिस्टर ऑफिसला लेखि तक्रार केली असून जे जागा खरेदी करणार आहेत त्यांनी ग्रामपंचायतीशी चौकशी करून जागा खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच सरपंच व 17 ग्रामपंचायत सदस्य यांनी हातकणंगले पंचायत समिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांना लेखी निवेदन देऊन सदर ग्रामविकास अधिकारी यांचीतत्काळ बदली करावी त्यांची बदली न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायतीची पायरी चढू देणार नाही. असे ठाम केले असून जबरदस्ती ग्रामपंचायतीमध्ये आल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा ही सरपंच डॉ.संतोष भोरे यांनी दिला आहे.यावेळी उपसरपंच विकी मानेसह ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.