34 व्या रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत चित्रकला व निंबध स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न
34 व्या रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, कोल्हापूर पोलीस दल, आर.एस.पी व सी.डी तसेच शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी येथील रोटरी क्लब येथे शालेय विध्यार्थ्यांच्या चित्रकला व निंबधलेखन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सदर स्पर्धेमध्ये व्यंकटराव हायस्कूल, बालाजी विद्यालय, गर्ल्स हायस्कूल, कबनूर हायस्कूल, शहापूर हायस्कूल, रत्नदीप हायस्कूल, नारायण मळा DKTE, राजर्षी शाहू हायस्कूल, दि न्यू हायस्कूल, विनायक हायस्कूल व मथुरा हायस्कूलच्या विध्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शहरातील वाहतुकीला शिस्त निर्माण व्हावी व वाहतुकीच्या नियमासंबधी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांच्यापर्यंत वाहतूक नियमांचे पालन व्हावे यादृष्टीने शहरातील नागरिकांच्यामध्ये जनजागृती निर्माण व्हावी याकरिता सदर स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते.
यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजीव पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते, सचिव पंकज कोठारी, सहायक फौजदार हिंदुराव चरापले, परीक्षक प्रमोद कोळेकर, सारंग दास सर, किरण हनिमनाळे सर, के.बी.पाटील सर, कोथळे सर आदींसह वाहतूक सल्लागार समितीचे सदस्य गजानन शिरगावे उपस्थित होते.