वस्त्रोद्योग आणि फौंड्री या प्रमुख उद्योगांसाठी प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजी शहरात शनिवारी, 24 फरवरी, रोजी कामगार कायद्यावर एक विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. ह्या विषयावर पुणे येथील नामवंत विधिज्ञ श्रेया काळेकर यांचे मार्गदर्शन मिळाले असून ते वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (वेसमेक), शाखा इचलकरंजी आणि माहेश्वरी युथ (माय) फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
सदर व्याख्यानाला उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्याख्यानादरम्यान विधिज्ञ काळेकर यांनी वस्त्रोद्योग आणि फौंड्री क्षेत्रातील कामगारांच्या हक्कांबाबत आणि त्यांच्या कल्याणासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, कामगार वाद टाळण्यासाठी आणि सामंजस्याने कामगार संबंधांची उभारणी करण्यासाठी कायदेशीर सल्लाही दिला.
या व्याख्यानाचा शुभारंभ महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्स चे संचालक श्री नितिन धूत व माय फाउंडेशन चे उपाध्यक्ष श्री श्यामसुंदर मर्दा यांच्या हस्ते करण्यात आला. कमिटी चेयरमैन म्हणून श्री. विठ्ठल बजाज, श्री. पवन डाळया, CA दीपक भरडिया आणि CA अनिल राठी यांनी काम पाहिले होते. वेसमेक इचलकरंजी अध्यक्ष अखिल बाहेती यांनी वेसमेकच्या पुढील कार्यक्रमाची माहिती दिली, प्रशांत दायमा यांनी आभार मानले तसेच कोषाध्यक्ष नितिन अग्रवाल यांनी सूत्र संचालन केले.