मुख्यमंत्री कार्यालय प्रधान सचिव विकास खारगे यांनी विद्यार्थ्यांशी साधला ऑनलाईन संवाद




महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल च्या १० वीच्या विद्यार्थ्यांशी परीक्षेला सामोरे जाताना घ्यावयाची काळजी याविषयी ऑनलाईन मार्गदर्शन केले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पोवार यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. यामध्ये शाळेतील विविध उपक्रमांची माहिती व १० वी साठी वर्षभर घेत असलेले विविध उपक्रमाची माहिती दिली. विकास खारगे यांनी १० वीच्या परीक्षेला सामोरे जाताना घ्यावयाची दक्षता याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना कोणतेही टेन्शन घेऊ नये.परीक्षेला आनंदाने सामोरे जावा. परीक्षेच्या हॉलमध्ये पोहोचेपर्यंत अभ्यास करा. परीक्षेला जाताना हलका आहार घ्या व उपाशीपोटी जाऊ नका. जी मुले कच्ची आहेत त्यांनी आणखीन शिक्षकांच्याकडे महत्त्वाचे प्रश्न जे परीक्षेला येणारे आय.एम.पी.प्रश्न सोडवून घ्या. सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा कोणते गैर मार्गाचा वापर करू नये कॉपीमुक्त अभियान शासनाचे धोरण आहे. त्या पद्धतीने आपण सर्वांनी जास्तीत जास्त अभ्यास करून यशस्वी व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर आँनलाईन मिटींगचे नियोजन नितेश शिंदे यांनी रुम्बर वॉलटॉप कॉम्प्युटर द्वारे केले. यामध्ये माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी राजू नदाफ, उमेश लाड, विजय हावळ, पांडुरंग डंबाळ, रफिक मुल्ला व शिक्षक पार्श्वनाथ पाटील शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व १०वी चे विद्यार्थी उपस्थित होते. आभारप्रदर्शन एम.ए.आयरेकर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post