हिंदू धर्माची एकता टिकवण्यासाठी संघटित राहणे अत्यंत गरजेचे - आमदार टि.राजासिंह

 हिंदू धर्माची एकता टिकवण्यासाठी संघटित राहणे अत्यंत गरजेचे - आमदार टि.राजासिंह

हुपरी येथील हुतात्मा स्मारकाच्या भव्य अशा मैदानावरती घेण्यात आलेली  हिंदू धर्म जागृती सभा ही मोठ्या उत्साहात संपन्न झाली सुरुवातीला शंखनाद, वेदमंत्र, याचे वाचन करण्यात आले मान्यवरांना हुपरीच्या चंदेरी नगरीत चांदीची तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.सनातन हिंदू धर्माची सद्यस्थिती या विषयावरती स्वाती खाडये यांनी आपले मनोगत व्यक्त केले सनातन हिंदू धर्म रोगासारखा आहे असे म्हणणारे जितेंद्र आव्हाड यांना त्यांनी सांगितले हिंदू धर्म हा अनादी व अनंत असा आहे आमचा एकच धर्म आहे तो म्हणजे हिंदू धर्म भारत देश हा हिंदू धर्मामध्ये विश्वगुरू आहे. घराघरांमध्ये हिंदू धर्म शिक्षण पोहोचवणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या धर्म जगला तर राष्ट्र जगेल राष्ट्र जगले तर तुमचे करिअर जगेल नाहीतर हिंदू राष्ट्र टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल असेही त्या म्हणाल्या. आमदार राजासिंह यांनी आपल्या मनोगतामध्ये श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेच्यावेळी हिन्दू धर्मियांची एकता व शक्ती सर्व महाराष्ट्राने बघितलेली आहे आणि ही अशीच टिकून ठेवून हे अधिकाधिक वाढवली जाईल. हिंदू धर्माची एकता टिकवण्यासाठी संघटित राहणे हे अत्यंत गरजेचे असून आपल्या धर्माविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आदर निर्माण करून घराघरांमध्ये श्री प्रभू रामाचे नाव पोहोचावे या उद्देशाने पाऊल उचलावे लागेल आणि हिंदू धर्माविषयी आपल्या मनामध्ये प्रतिष्ठा निर्माण करणे गरजेचे आहे. काश्मीर मधील 370 कलम रद्द केले प्रभू श्रीराम मंदिर उभे राहिले आम्हाला जे पाहिजे होते तसे होत आहे. तर राजेश शिंदे म्हणाले आम्ही जिजाऊचे वारसदार असून हिंदू धर्म टिकवण्यासाठी प्रत्येकाचे रक्त हे भगवे असावे लागते आणि ते प्रत्येकाच्या अंगी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी समस्त हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. तर यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हुपरी पोलीस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.व

सुंधरा शक्ती न्यूजसाठी हुपरीहून चिनू निंबाळकर

Post a Comment

Previous Post Next Post