एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज,बाहुबली मध्ये इयत्ता १०वी चा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न.
एम.जी.शहा विद्यामंदिर व जु.कॉलेज बाहुबली मध्ये आज, शनिवार, दिनांक १० /०२ /२०२४ रोजी इयत्ता १० वीचा सदिच्छा समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री.चंद्रकांत ऐनापूरे,सांगली हायस्कूल, सांगली हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री.गोमटेश बेडगे हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते परमपूज्य गुरुदेव १०८ समंतभद्र महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनींनी मंगलाचरण सादर केले.स्वागत,प्रास्ताविक व प्रमुख अतिथी यांचा परिचय प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री.अनिल हिंगलजे यांनी करून दिला.यानंतर इयत्ता दहावी मधील सर्व तुकडी मधून विद्यार्थी मनोगत संपन्न झाले. यामध्ये प्रथम इ.१० वी(अ) मधून कुमारी वेदिका विनोद शिंदे, हिने आपल्या शालेय जीवनातील विविध आठवणी सांगितल्या तसेच सर्व पदाधिकारी व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.इयत्ता दहावी (ब) मधून चिरंजीव परमानंद शीतल हेरवाडे यांनी आपल्या शालेय जीवनातील तसेच गुरुकुलातील आठवणी सांगितल्या.इयत्ता दहावी (क) मधून चिरंजीव सुजल विजय बागणे याने सुद्धा आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.इयत्ता दहावी (ड) मधून कुमारी समीक्षा बाबासो भिसे हिने सुद्धा आपल्या आठवणी सांगितल्या.विद्यार्थ्यांच्या मनोगतानंतर अतिथी सन्मान संपन्न झाले यामध्ये प्रशालेचे माननीय मुख्याध्यापक श्री. गोमटेश बेडगे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. चंद्रकांत ऐनापूरे सर यांचा प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आलात्यानंतर इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांकडून प्रशालेला भेटवस्तू प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. इयत्ता दहावी (अ) कडून वर्गातील स्मार्ट बोर्ड साठी साऊंड बार ही वस्तू प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी मनोगतामध्ये श्री.चंद्रकांत ऐनापुरे सर यांनी विविध प्रेरणादायी उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा हे सांगितले तसेच जर तुमचे विचार श्रेष्ठ असतील तर तुमचे हृदय हे देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. तसेच मोबाईलचे फायदे व तोटे कसे आहेत तेही विविध उदाहरणाद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले.व पुढील कार्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. गोमटेश बेडगे सर यांनी देखील विद्यार्थ्यांना पुढील काळामध्ये अथक परिश्रम करणे गरजेचे आहे याचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.शेवटी सौ. वैशाली लठ्ठे यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी गुरुकुलाचे अधीक्षक माननीय श्री.ए.ए.खाडे सर तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई सर, तांत्रिक विभाग प्रमुख माननीय श्री.रवींद्र देसाई सर व व्यवसाय विभाग प्रमुख श्री. अरुण चौगुले सर हेही उपस्थित होते. तसेच अध्यापक- अध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुदर्शन चौगुले व श्री. विजय ककडे यांनी केले.