येथील श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्त पंचगंगा नदी तीरा वरील वरद विनायक गणेश मंदिरात मंगळवार ता.13 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गणेश जयंती निमित्त पंचगंगा वरद विनायक मंदिरात सकाळच्या सत्रात ज्ञानेश्वरी पारायण तर दुपारच्या सत्रात भजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. गणेश जयंती निमित्त मंगळवार तारीख 13 रोजी सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण सकाळी साडेआठ वाजता श्रींची 'सहस्त्र वर्धने' सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत मारवाडी युवा मंच तर्फे आरोग्य तपासणी शिबिर, सकाळी सव्वा दहा वाजता सौ. रेवती आनंद सागर यांचे गणेश जन्माचे प्रवचन, दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ व प्रसादाचे वाटप, सायंकाळी पाच वाजता सप्तशृंगी महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी साडेसहा वाजता मारवाडी मंच मिड टाउन तर्फे दीपोत्सव, सायंकाळी सात वाजता महारती, बुधवार तारीख 14 रोजी सकाळी साडेआठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण व सप्ताह सांगता सोहळा व सकाळी 11 वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अशोकराव स्वामी ,बाळासाहेब जांभळे, द्वारकाधीश सारडा यांनी केले आहे.