कोरोची ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच डॉ.संतोष भोरे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी सरपंच पदासाठी अपात्र घोषित केले आहे.

याबाबतचा आदेश 31 जानेवारी रोजी जारी करण्यात आला होता. त्याबाबतचे पत्र तक्रारदार माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे यांना पोस्टाद्वारे मिळालेले आहे. कोरोची गावचे लोकनियुक्त सरपंच व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख डॉ.संतोष भोरे यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सरपंच पद अपात्र असल्याचे आदेश देण्यात आले आहेत. डॉ.संतोष भोरे 2022 - 2027 या सालाकरिता अपक्ष लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते अर्ज भरताना काहींनी डॉ. भोरे यांनी शासकीय गायरानात अतिक्रमण करून घर बांधण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.त्यात हे अपात्र ठरले आहेतलोकनियुक्त सरपंच डॉ.संतोष भोरे यांच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, संतोष वाघेला, सॅम आठवले, राजू कसबे, लखन कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीत सरपंच डॉ.संतोष भोरे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात दाखल कागदपत्रे, दोन्ही पक्षांची लेखी जबाब, युक्तिवाद, ग्रामपंचायत सचिव, तलाठी व मंडल अधिकारी यांच्या संयुक्त अहवालानंतर सरपंच भोरे व त्यांच्या कुटुंबीयांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सरपंच डॉ.संतोष भोरे यांना अपात्र घोषित केले आहे.याबाबत डॉ.संतोष भोरे म्हणाले निकालाची प्रत अध्याप मिळाली नाही ते मिळाल्यावर जिल्हाधिकारी यांचे निकाला विरुद्ध विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल करणार असल्याचे व्यक्त केले.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कोरोचीहून : अमित काकडे