नेसरीच्या सुतार कुटुंबाला जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे संस्थेची मदत

 नेसरीच्या सुतार कुटुंबाला जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे संस्थेची मदत

नेसरी येथील युवराज सुतार यांच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागली व या आगीमुळे त्यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याची माहिती मिळताच जनसेवा सामाजसेवक नरसू शिंदे संस्था व संस्थेच्या सदस्यांनी  नेसरीच्या युवराज सुतार याची भेट देऊन त्यांना जिवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत देऊ केली. यावेळी समाजसेवक नरसू शिंदे, आनंदा सुतार, सुधाकर घोरपडे, अशोक भालेकर, भिकाजी गोंधळी, विष्णू पाटील, अमोल बागडी, प्राध्यापक रवींद्र हिडदूगी, बाळासाहेब नावलगी, चंदू संकपाळ, पत्रकार पुंडलिक सुतार आदी सदस्य उपस्थित होते. तर सुतार कुटुंब उध्वस्त होऊ नये म्हणून समाजाने युवराज सुतार यांच्या 9730705277 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मदतीचा हात पुढे करावा असे आव्हान ही जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post