चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातुन वन विभागाच्या कोल्हापूर येथील मुख्य कार्यालय येथे बेमुदत ठिया आंदोलन येथे सूरू आहे. या बेमुदत ठिया आंदोलनास प्रकल्प ग्रस्ताच्या मागण्यासाठी कायम पाठीशी असणारे हातकणंगलेचे कार्यसम्राट मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर (संचालक गोकुळ दूध संघ कोल्हापूर) भेट दिली.
व आपल्या मागण्या बाबत मा.मुख्यमंत्री महोदय व संबधित खात्याच्या मंत्री महोदयांच्या कडे पत्र व्यवहार करून आपल्या मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी म्हणाले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष,जिल्हा अध्यक्ष व सदस्य तसेच प्रकल्पग्रस्त खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.