जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. परंतु आता पुढच्या महिन्यापासून काही युजर्सला Whatsapp वापरण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण काही स्मार्टफोनवर पुढच्या महिन्यापासून Whatsapp बंद करण्यात येणार आहे.सध्या Whatsapp हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अँड्रॉइड फोनवर काम करते. ज्या स्मार्टफोनचे अँड्रॉइड व्हर्जन 4.1 आहे अशा वर्जनवरच Whatsapp सध्या सुरू आहे. परंतु आता 24 ऑक्टोंबर पासून व्हाट्सअप फक्त अँड्रॉइड 5.0 या नवीन व्हर्जन वाल्या स्मार्टफोनवरच काम करणार आहे. त्याचबरोबर Iphone वापरणाऱ्यांमध्ये देखील ios 12 किंवा त्याच्यापेक्षा वरील वर्जन मध्येच Whatsapp काम करेल. ios 12 च्या खालील कोणत्याही Iphone मध्ये आता Whatsapp चालणार नाही