रायफल शुटींग क्रिडा स्पर्धेत निहाल कुर्वे चे सुयेश

 



*


क्रिडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपूर द्वारा आयोजित जिल्हास्तर शालेय रायफल शुटिंग क्रिडा स्पर्धाचे तालुका क्रिडा संकुल उत्तर नागपूर येथे १५ ते १८ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रहार मिलेट्री स्कुलचा विद्यार्थी निहाल यशंवत कुर्वे यांने रायफल शुटींग स्पर्धेत रौप्य पदक मिळवले असुन त्याची विभागीय स्थरावर निवड झालेली आहे. या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा क्रिडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका क्रिडा अधिकारी राजेंद्र साप्ते, क्रिडा अधिकारी अनिल बोरवार तथा आरेंज सिटी स्पोर्ट शुटींग क्लबचे जनरल सेक्रेटरी अनिल पांडे आदिंसह आरेंज सिटी स्पोर्ट्स शुटिंग क्लबचे सहकारी उपस्थित होते. निहाल कुवेॅ याने या यशाचे श्रेय त्याचे प्रशिक्षक अनिल पांडे व त्याचे सर्व सहकारी तसेच प्रहार मिल्ट्री स्कुलचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व सर्व कर्मचारीवृंद यांना दिलेले आहे. या निवडी बदल त्याचे सर्व स्तरातून अभिनंद आहे.

Post a Comment

Previous Post Next Post