पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या संकल्पनेवर आधारित "पोलीस बाप्पा" गीताला देशात उदंड प्रतिसाद ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन





इचलकरंजीचे सुपुत्र सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या संकल्पनेवर आधारित पोलीस बाप्पा (नसे से मुक्ति) या गाण्याचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या गाण्यांमध्ये अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, अनुमलिक, एम सी स्टॅन, शिव ठाकरे यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. राजेंद्र काणे हे मूळचे इचलकरंजीचे असून ते सध्या मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक वर्षी ते आपल्या घरी पोलीस वेशातील गणेशाची प्रतिष्ठापना करतात आणि गाण्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देतात.या वर्षीही काणे यांनी परंपरा कायम ठेवली आहे.नसे से मुक्ति या गाण्याची निर्मिती केली असून कोकीन,चरस, गांजा अफू आदी मादक पदार्थांच्या पासून युवकांनी दूर राहण्याचा संदेश गाण्याच्या माध्यमातून दिला आहे.या गाण्याच्या निर्माता वैशाली राजेंद्र काणे असून कार्यकारी निर्माता तसेच दिग्दर्शक राहुल खंदारे आहेत.याला अनु मलिक यांनी संगीत साज चढवला असून नकास अजीज यांनी हे गाणे गायले आहे.स्क्रिप्ट लेखन अरुण काशीद आणि विक्रम खांडेकर यांनी केले आहे. ध्वनिमुद्र यशराज स्टुडिओमध्ये करण्यात आले या गाण्यात बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे, एमसी स्टॅन, शिव ठाकरे, प्रतीक सेजपाल, उषा नाडकर्णी, राकेश टंडन, कृष्णा अभिषेक, किकु श्रद्धा, जय भानुषाली, प्रिन्स नारुला, प्रिन्स नरुला, परल पुरी आदींनी काम केले आहे. हिंदी भाषेतील या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचे प्रकाशन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राहुल खंदारे अनु मलिक, वैशाली काणे, विशाल पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post