सेनापती कापशी येथील मंडळाला १० हजार रुपयाचा दंड




सेनापती कापशी येथील गणेश तरुण मंडळाने गणेश आगमन मिरवणूकीत ध्वनी प्रदुर्षणाच्या नियमांचा भंग केला म्हणून मंडळचे पदाधिकारी, साऊंड सिस्टीम मालक, टॅक्टर चालक यांच्यावर कारवाई केली होती. त्यानुसार चौघांना प्रत्येकी २५०० रुपये असा १० हजारांचा दंड कागल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठवला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव २०२३ च्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या अंतर्गत ध्वनी प्रदुषण तरतुदीनुसार ध्वनी प्रदुषण नियमांचे उल्लंघन करणारे गणेश मंडळांचेवर कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक यांनी प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी मार्गदर्शक पर सुचनां दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने मुरगूड पोलीस ठाणे कडुन पोलीस निरीक्षक गजानन सरगर व पोलीस स्टाफ यांनी कापशी सेनापती येथील श्री गणेश तरुण मंडळ यांनी मंगळवार १९ सप्टेंबर रोजी सार्वजनीक गणेश मुर्ती आगमनाच्या वेळी विनापरवाना लाऊड स्पीकर लावून ट्रॅक्टरवरून मिरवणुक काढले बद्दल मंडळाचे अध्यक्ष भिकाजी दिलीप सणगर, रा.कापशी सेनापती, उपाध्यक्ष अमीर आयुब मुल्ला, रा.कापशी सेनापती, साऊंड सिस्टीम मालक निलेश नेताजी ढेरे, रा.आलाबाद, ट्रॅक्टर चालक / मालक स्वप्नील राजाराम तेली रा.आलाबाद, ता.कागल यांचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे कारवाई करून त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कागल यांचे कोर्टामध्ये हजर केले असता आज सदर चौघांना प्रत्येकी २५००/- रूपये प्रमाणे असा एकुण १०,००० /- रूपये दंड केलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post