कोल्हापूरसह इचलकरंजी शहर व परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा पुर्ण क्षमतेने कार्यान्वीत : पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित

 


कोल्हापूरसह इचलकरंजी शहर व जिल्हा परिसरातील वाहतुक व्यवस्था, गुन्हेगारीस आळा घालणेसाठी तसेच महत्वाचे सण, उत्सवाचे दरम्यान कायदा सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे या करीता कोल्हापूर शहर,पाचगांव तसेच इचलकरंजी शहर व परिसरासह कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाची शहरे व ठिकाणांना सीसीटीव्हीच्या कक्षेत आणणेत आली आहेत. मागील काही काळा पासून कोल्हापूरसह इचलकरंजी शहर व परिसरातील सेफ सीटी प्रकल्प अपग्रेडेशन सुरु होते. या प्रयत्नांना यश म्हणून कोल्हापूरसह इचलकरंजी शहर व परिसरातील सेफ सीटी प्रकल्पाचे सीसीटीव्ही कॅमेरे हे आता पुर्वी पेक्षाही परिणामकारकरित्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत करणेत आलेले आहेत. त्याच प्रमाणे ज्या ठिकाणांवर ब्लॅक स्पॉट, ब्लॅक स्पॉटची बाधा येत होती त्या ठिकाणांवर आगामी काळात येवू घातलेल्या कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीकोनातून महत्वाचे असे गणेशोत्सवासह इतर महत्वाचे सण, उत्सव तसेच वाहतुक व्यवस्थेचे नियंत्रण, गुन्हेगारीस आळा घालणे व बंदोबस्ताचे संनियंत्रण सुनिश्चित करणेसाठी महत्वाच्या ठिकाणच्या खाजगी आस्थापनांचे सीसीटीव्हीचा अॅक्सेस घेणेची प्रक्रिया सुरु केलेली आहे. याच प्रक्रियेंतर्गत दिनांक ०४/०९/२०२३ रोजी पासून कोल्हापूरसह इचलकरंजी शहर व जिल्हा परिसरातील सेफ सीसीटीव्ही कॅमेरांसह खाजगी आस्थापनांचे सीसीटीव्ही पूर्ण क्षमतेने सुरु केलेले आहेत. त्यामुळे पोलीसांना गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणेसोबतच कायदा सुव्यवस्था राखणेस मदत होणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.महेंद्र पंडित यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post