इंटरनॅशनल लॉ कॉन्फरन्ससाठी अ‍ॅड. शिवराज चुडमुंगे, अ‍ॅड. अमित सिंह उपस्थित राहणार

 


 

इचलकरंजी बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यावतीने नवीदिल्ली विज्ञान भवन येथे 23 सप्टेंबर 2023 रोजी इंटरनॅशनल लॉ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारताचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचुड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी जगातील 116 देशाचे बार कौन्सिलर उपस्थित राहणार आहेत व भारतातील सर्व बार कौन्सिलचे सदस्य उपस्थित असणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील लॉ फर्मस् तसेच जगविख्यात नामांकित वकील व भारतातील नामांकित वकील तसेच न्यायमूर्ती या कॉन्फरन्सचा महत्वाचा भाग असतील. भारताची न्यायव्यवस्था प्रणाली बळकट करण्याकरता तसेच जागतिक पातळीवरील न्यायप्रणाली याचे अवलोकन करून जलद गतीने न्याय मिळण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करून न्याय निर्गती तत्पर होणे हा या कॉन्फरन्सचा उद्देश आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन मननकुमार मिश्रा यांनी राज्यातील बार कौन्सिल यांना निमंत्रित केले आहे. त्याप्रमाणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवा चे चेअरमन विवेकानंद घाटगे यांच्या सोबत इचलकरंजी बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज चुडमुंगे व अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड.अमित सिंह कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post