स्वच्छ भारत मिशन 2.0’ अंतर्गत संपूर्ण देशात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमात ‘सिटीझन फिडबॅक‘ या घटकांतर्गत शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त सक्रिय सहभाग नोंदविणे अपेक्षित असल्यामुळे जास्तीत जास्त संख्येने इचलकरंजी शहरवासियांनी खालील लिंकद्वारे फिडबॅक द्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्त होत असलेल्या सुचनेनुसार आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनेही सदर उपक्रम ‘स्वच्छ इचलकरंजी, 'सुंदर इचलकरंजी, 'माझी इचलकरंजी’ हे घोषवाक्य घेऊन राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सिटीझन फिडबॅक अंतर्गत सहभाग नोंदवावा असे आयुक्त श्री. दिवट यांनी म्हटले आहे.
Tags
स्थानिक बातम्या