13 फेब्रुवारी आणि 31 मार्च 2023 रोजीच्या बैठकीत मंजूरी मिळालेल्या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या नोंदणीचे कामकाज सोमवार 7 ते 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत संजय गांधी निराधार योजना कार्यालयात सुरु राहणार आहे.संजय गांधी निराधार योजना कार्यालयात 13 फेब्रुवारी 2023 आणि 31 मार्च 2023 रोजी झालेल्या बैठकीत विविध पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. या पात्र लाभार्थ्यांची पोस्ट कार्यालयात खातीसुध्दा काढण्यात आलेली आहेत. अशा लाभार्थ्यांची संजय गांधी योजना कार्यालयाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सोमवार 7 ते बुधवार 9 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत नोंदणी करुन घेतली जाणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी मंजूर पत्र, आधारकार्ड आणि पोस्ट खात्यातील पासबुकाची झेरॉक्स आणि रोजच्या वापरातील मोबाईल क्रमांक यासह सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत संजय गांधी योजना कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालयाच्या प्रभारी नायब तहसिलदार सुरेखा पोळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
Tags
स्थानिक बातम्या