कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यभार स्वीकारल्यानंतर, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.संतोष पाटील यांची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा समन्वयक अँड दयानंद पाटील नंद्याळकर यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामविकासा साठी सरपंच व प्रशासन यांच्यात योग्य समन्वयसाठी, तसेच जिल्हा पातळीवरील सरपंचांच्या प्रलंबित प्रश्न याबाबत पूर परिस्थिती स्थिती आटोक्यात आल्यानंतर लवकरच जिल्हास्तरीय सरपंचाची व्यापक बैठकीस उपस्थित राहुल मार्गदर्शन करण्याचे आश्वासन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. पाटील यांनी सरपंच परिषद परिषदेचे शिष्टमंडळास दिले. यावेळी सरपंच परिषदेचे पदाधिकारी जिल्हा समन्वयक जी .एम. पाटील, करवीर तालुका समन्वयक जोशना पाटील, राधानगरी तालुका समन्वयक अर्चना रंगराज किल्लेदार, कागल तालुका सरचिटणीस अनिल कांबळे यांच्यासह राहुल शेटे(हेरले), पंढरीनाथ भोपळे (चापोडी), सर्जेराव शिंदे ( दोनवडे), मीनाक्षी दिनकर कुंभार (कुरुकली) या गावचे सरपंच उपस्थित होते.
Tags
स्थानिक बातम्या