माद्याळ ग्रामपंचायत सरपंच पदी बंडू सुतार बिनविरोध ; गट नेते सूर्याजी घोरपडे यांचे माद्याळ ग्रामपंचायतीवर वर्चस्व

 



कागल तालुक्यातील माद्याळ ग्रामपंचायत सरपंच पदी मंत्री हसनसो मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते बंडू सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली कापशीचे मंडल अधिकारी श्री संजय पुजारी यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले त्यांना ग्रामविकास अधिकारी एन के कुंभार यांनी सहकार्य केले ठरल्याप्रमाणे मावळ ते सरपंच सौ संगीता खोत यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर श्री बंडू सुतार यांची निवड करण्यात आली सरपंच पदी श्री सुतार यांची निवड झाल्याबद्दल तालुका संघाचे माजी चेअरमन व गटनेते श्री सूर्याजी घोरपडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्कारमूर्ती व नूतन सरपंच श्री बंडू सुतार आपल्या मनोगतात म्हणाले आमचे नेते श्री हसन साहेब मुश्रीफ व गट नेते सूर्याजी घोरपडे यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडीन तर माद्याळ गावाला दर्जेदार सुविधा देण्यासाठी कटिबंध राहीन यावेळी उपसरपंच श्री ज्योतिबा भिऊगडे मावळत्या सरपंच सौ संगीता खोत संताजी चौगुले सुशांत खवरे मिलन चोथे कांचन सुतार सुनिता कांबळे मनीषा चव्हाण सर्व मुश्रीफ प्रेमी कार्यकर्ते ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकीकडे कापशी पंचक्रोशीत ग्रामपंचायतच्या मध्ये सदस्य फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे तर मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्यांचा घोडा बाजार चालू असताना कापशी जिल्हा परिषद मतदार संघातील मोठ्या ग्रामपंचायतवर मंत्री मुश्रीफ गटाची एक हाती सत्ता राखण्यास गावचे नेते तालुका संघाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री सूर्याजी घोरपडे यशस्वी झाल्यामुळे कापशी पंचक्रोशीत चर्चेचा विषय सध्या सुरू आहे.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी : यशवंत पाटील

Post a Comment

Previous Post Next Post