इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकुड योजनेतून मिळणारे मंजुर पाणी हे हक्काचे असून यामुळे कुणाच्या आरक्षित पाण्याला धक्का लागणार नसल्याने ही योजना पूर्ण झाली पाहिजे. यासाठी जनजागृती मोहीम राबवली गेली पाहिजे. तसेच पुरेसे पाणी मिळणे ही प्रत्येक नागरिकाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे समस्त इचलकरंजीकरानी याबाबत एकत्र येण्याची गरज आहे. त्याला लोकचळवळीचे स्वरूप दिले पाहिजे.असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सदर बैठकीत प्रसाद कुलकर्णी, सुनील बारवाडे, उमेश पाटील, माजी नगरसेवक अमरजीत जाधव, राजेश बांगड, चंद्रकांत कोष्टी, अरुण बांगड, राजुदादा आरगे, धैर्यशील कदम, अमोल मोरे, अभिजित पटवा यांनी या प्रश्नावरील आपली मते मांडली. यावेळी इचलकरंजी शहरास शासनाने मंजूर केलेली योजना कोणत्याही पद्धतीने रद्द करण्यात येणार नाही असे झाल्यास शासनास कोणतीही योजना राबवता येणार नाही.सदर योजना राबविण्याचे पूर्ण दायित्व शासनाचे असून ज्या काही अडचणी आहेत त्या शासकीय पातळीवर दूर कराव्यात आम्हाला आमच्या हक्काचे पाणी देण्यात यावे असा ठराव करण्यात आला.यावेळी ऑनलाईन पोल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना इमेल मोहीम,सह्यांची व्यापक मोहीम कोपरा सभा द्वारे जनजागृती करणे, वेळ पडल्यास कायदेशीर मार्ग अवलंबणे याबाबत ठोस निर्णय घेण्यात आले. इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या हक्काचे पाणी असून त्याला चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरवून विरोध करण्यात येत असल्याने पहिल्या टप्प्यात त्याबाबत स्थानिक नागरिकांना जागृत करण्याचे ठरवण्यात आले. सदर मोहीम ही राजकारण विरहीत करण्याचे ठरवण्यात आले असून यामध्ये समविचारी संघटनांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्याचे आले आहे. यावेळी रवींद्र भंडारी, दीपक सुतार सुहास पाटील, शहाजहान पटेकरी, राजु पाटील, अमृत पारख, राम आडकी, उदयसिह निंबाळकर, राजु कोन्नूर, अमोल ढवळे, बसय्या स्वामी जतीन पोतदार, विद्यासागर चराटे, दयानंद लिपारे उपस्थित होते.
Tags
स्थानिक बातम्या