संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये खासदार धैर्यशील माने यांनी देशातील गोरगरीब व सर्व सामान्य नागरिक त्यांच्या कर्जाचे खासगी फायनान्स कंपनीमधील कर्जाचे हप्ते ईएमआयचे हप्ते व क्रेडिट कार्डचे हप्ते काही अपरिहार्य कारणामुळे अप्रत्याशित परिस्थिती, आजारपण, व्यवसायातील नुकसान इत्यादींमुळे वेळेत परतफेड करू शकत नाहीत. अशावेळी बऱ्याच बँकांमध्ये त्यांना सहानुभूतीची वृत्ती न बाळगता राष्ट्रीयकृत बँका निर्माण होण्याच्या पूर्वी खाजगी सावकार दहशतीने कशा पद्धतीने व्याज आकारणी करत होते तसे व्याजावर व्याज आकार करून कर्जदारांवर कर्जाचा बोजा टाकत असल्याचे निदर्शनास आणून दिले व सर्वसामान्य गोरगरीब कर्जदार जनतेला चुकीच्या पद्धतीची वागणूक देऊन त्यांच्यावर जबरदस्ती करत असल्याचे निदर्शनास आणून देउन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अशा बँकांवरती आपण काय कारवाई करणार आहात का व याबाबत सर्वसामान्य गोरगरीब कर्जदार जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने काय निर्णय घेणार आहात का असा प्रश्न खासदार धैर्यशील माने यांनी विचारला. खासदार धैर्यशील माने यांनी विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर देत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खासदार माने आणि अत्यंत संवेदनशील असा प्रश्न विचारला असल्याचे नमूद करून याबाबतच्या अनेक घटना माझ्या निदर्शनास आल्या असल्याचे कबूल केले व अशा पद्धतीने कर्जदारांना चुकीची वागणूक देणाऱ्या राष्ट्रीयकृत खाजगी व सर्वच प्रकारच्या बँकांना RBI रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून अशा कर्जदारांच्या बरोबर सहानुभूतीपूर्वक व भावनिकरित्या वागून त्यांच्याबरोबर चर्चा करून कर्जाची परतफेड करून घेण्याच्या सूचना दिल्या जातील असे सांगितले. प्रश्नाच्या सुरुवातीस खासदार धैर्यशील माने यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी व अर्थमंत्री निर्मला जी सितारामन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या आर्थिक वर्षात सुमारे रु. 1 ट्रिलियन इतका मोठा नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कामगिरी उत्कृष्ट आणि कौतुकास्पद असल्याचे सांगून सरकारच्या कामाचे कौतुक ही केले. खासदार धैर्यशील माने यांनी हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आवाज संसदेमध्ये उठवल्यामुळे मनमानी चुकीच्या पद्धतीने कर्ज वसुली करणाऱ्या बँकांना लगाम लागून सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळणार आहे.
Tags
स्थानिक बातम्या