वाठार गावच्या माजी ग्रा पं सदस्या पुष्पांजली क्षीरसागर यांचे अपघाती निधन


वाठार : (किशोर जासूद)

वाठार ता.हातकणंगले येथील माजी ग्रा.पं.सदस्या पुष्पांजली संजय क्षीरसागर (वय वर्ष 48) यांचे आज सकाळी घुणकी येथील वारणा नदी पुलाजवळ झालेल्या अपघातात डोक्यावरून चाक गेल्याने जागीच ठार झाल्या पेठ वडगाव पोलीस स्टेशन मधून मिळालेली अधिक माहिती अशी की वाठार गावच्या मा ग्रा पं सदस्या पुष्पांजली क्षीरसागर या पती संजय भानुदास क्षीरसागर यांच्या समवेत आपल्या ऍक्टिवा MH O9FG2671 वरून बहादुरवाडी येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी 10 च्या सुमारास जात होत्या घुणकी वारणा नदीच्या पुलाच्या पाठीमागील वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेत त्या खाली पडल्या तर पती बाजूला फेकले गेले तर पुष्पांजली क्षीरसागर यांच्या डोक्यावरून ट्रॅकचे चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या तर पती जखमी झाले त्यांना उपचारासाठी वडगांव येथील कुडाळकर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी जावई नातवंडे,असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post