विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

 शिवसेना ठाकरे गटामधील अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला असताना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला शिंदे गटाने सुरंग लावला असून आज विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. निलम गोर्‍हे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. निलम गोर्‍हे या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. 

अखेर निलम गोर्‍हे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.









Post a Comment

Previous Post Next Post