महिलांना घरबसल्या रोजगाराचे साधन निर्माण करून देणार : जिल्हाप्रमुख रवींद्र माने

 महिलांना घरबसल्या रोजगार निर्माण करून त्यांना त्यांच्या कुटुंबासाठीआर्थिक हातभार लावता यावा यासाठी महिला सबलीकरण करण्याच्या हेतूने त्यांना घरबसल्या काम व त्या कामाला चांगला दाम असे सूत्र अवलंबून इचलकरंजीतील दीडशे महिलांना घरबसल्या रोजगाराचे पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले  या प्रशिक्षणामधून महिलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी कशा तयार करायच्या हे त्यांना शिकवण्यात आले ज्या महिलांनी या रोजगार प्रशिक्षणाचा लाभ घेतला यावेळी त्यांना अतिशय आनंद झाल्याचे दिसून आले कित्येक महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना इचलकरंजी शहरांमध्ये पहिल्यांदाच महिलांच्यासाठी असा उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांचे आभार मानले सौ रुपाली रवींद्र माने व महिला आघाडी शिवसेना उपजिल्हाप्रमुख वैशालीताई डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार उद्योग प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल दीडशे महिलांना प्रशस्तीपत्र सौ रुपाली रवींद्र माने यांच्या हस्ते देण्यात आले तसेच इचलकरंजी शहरप्रमुख रूपालीताई चव्हाण तसेच कबनूर शहर प्रमुख राजश्री यादव व महिला आघाडीच्या सर्व उपशहर प्रमुख विभाग प्रमुख यांनी हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला या प्रशिक्षणाला के.डी.सी.सी बँकेचे प्रतिनिधी श्री राजू लायकर साहेब यांचे सहकार्य लाभले.




Post a Comment

Previous Post Next Post