योग दिनानिमित्त रेणुका मंदिर परिसरात भाजपाचं योग सत्र; प्रमुख नेते राहणार उपस्थित

जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार, 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता पंचगंगा नदी घाट परिसरातील रेणुका मंदिराच्या प्रांगणात भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या इचलकरंजी शहर शाखेने योग सत्राचे आयोजन केले असून, या कार्यक्रमाला आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात भाजपाचे सर्व पदाधिकारी, विविध सेलचे प्रमुख, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.