श्री.मथुरा शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

श्री.मथुरा शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

दातार मळा परिसरात असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूल, मथुरा विद्यामंदिर व प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला. यासाठी तुळजाभवानी योगसाधना मंडळ तांबे माळ येथील योग प्रशिक्षक श्री विद्याधर पाटील व सौ वंदना माने या उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षकांना विविध प्रकारची आसने प्रात्यक्षिकासहित करून दाखवली. तसेच त्यांचे महत्त्व हे सांगितले त्यानंतर प्राणायामचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच प्राणायामचे महत्त्व देखील सांगण्यात आले. शेवटी विश्वप्रार्थनेने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी मथुरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.एस.जी.चव्हाण, मथुरा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका एस.डी.इक्कळकी, क्रीडा विभाग प्रमुख श्री.एस.एस.वारके, तिन्ही शाखेचे सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री.एस.जी.चव्हाण यांनी विद्याधर पाटील यांचे तर मुख्याध्यापिका एस.डी.इक्कळकी यांनी सौ. वंदना माने यांचे स्वागत केले. प्रशालेचे सहाय्यक शिक्षक सही वाय.एन.कोथळे यांनी प्रशिक्षकांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post