नेसरीची कन्या श्रेया देसाई भारतीय नौदलात लेफ्टनंट पदी

नेसरीची कन्या श्रेया देसाई भारतीय नौदलात लेफ्टनंट पदी

गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी गावच्या श्रेया मिलिंद देसाई हिची भारतीय नौदलात लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे. ही बाब कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. श्रेया हिने कोल्हापूर येथील न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती शाहू विद्यालयात शिक्षण घेतले. शालेय जीवनात असतानाच ती Tara Commando Force (TCF) या विशेष सैनिकी प्रशिक्षण योजनेचा सक्रिय भाग होती. ही योजना खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या संकल्पनेतून १९९८ साली सुरू करण्यात आली.


मुलींना शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि नैतिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना संरक्षण दलांमध्ये सेवा देण्यासाठी सज्ज करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. TCF युनिटमधून मिळालेले प्रशिक्षण, खासदार शाहू छत्रपती महाराज यांचे वेळोवेळी झालेले मार्गदर्शन आणि वैयक्तिक सहभाग विद्यार्थिनींसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. या सशक्त पार्श्वभूमीमुळेच श्रेया देसाईसारख्या विद्यार्थिनी आज देशाच्या सेवेसाठी पुढे सरसावत आहेत. तिच्या या यशामुळे नेसरी गाव, कोल्हापूर जिल्हा आणि TCF उपक्रमाचा गौरव वाढला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post